बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. गेली दोन महिने शाहरुखच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु होता. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर शाहरुख हा कोणत्या कार्यक्रमात दिसला नाही. मात्र त्यानंतर आता शाहरुखचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहते त्याचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे.
शाहरुखने या कार्यक्रमात त्याच्या करिअरबद्दल एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी याने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहरुख खान एका कार्यक्रमात बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या करिअरमध्ये त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांचा उल्लेख करताना दिसत आहे.
या व्हिडीओत शाहरुख खान म्हणतो की, “माझ्या करिअरमध्ये सर्वाधिक मोठा वाटा हा महिलांचा आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री आणि महिला दिग्दर्शक यांच्याही यात समावेश आहे. त्यासोबतच मीडियामध्ये काम करणाऱ्या महिलांचेही यात विशेष सहकार्य आहे.”
अभिनेता सलमान खानला सर्पदंश, पनवेलच्या फॉर्महाऊसवर घडली घटना
“मी या गोष्टींचा फार प्रेमाने सांगत आहे. कारण त्या गोष्टींचा प्रचंड आदर करतो. माझ्या करिअरमध्ये पुरुषांनी सहकार्य केले नाही असे नाही. पण माझ्या आयुष्यात पहिल्यापासून महिलांचे विशेष स्थान आहे. मग ती माझी आई, बहीण, मुलगी किंवा माझी पत्नी असो. या सर्वांचे माझ्या आयुष्यात योगदान प्रचंड मोठे आहे. एखाद्या चित्रपटाचे श्रेय त्यातील हिरोला दिले जाते. मी देखील अनेक चित्रपटांचे श्रेय घेतले आहे, ज्यातील ९० ते ९५ टक्के चित्रपटांचे श्रेय महिला अभिनेत्रींचे आहे. खरतर मी त्यांच्या नावाचे खातोय,” असेही त्याने सांगितले.
विरल भयानीने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच त्या व्हिडीओची प्रचंड चर्चाही पाहायला मिळत आहे. शाहरुखचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तसेच यावर अनेक लाईक्स आणि कमेंटही पाहायला मिळत आहे.