बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांनी ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात सिद्धार्थ आणि आलिया यांच्यात किस करतानाचा एक सीन चित्रित करण्यात आला होता. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. मात्र या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने चित्रीकरणाचा अनुभव शेअर केला होता. त्यावेळी त्याने एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला होता. यामुळे सर्वचजण चकित झाले होते.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटात वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट या तिघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला आलिया भट्टबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी सिद्धार्थने आलियाला किस करणे ही सर्वात विचित्र गोष्ट होती, असे  सांगितले होते. “आलियाला किस करतेवेळी तिचे डोकं, ओठ, नाक यासर्व गोष्टींची काळजी घेतली जात होती. त्यामुळे माझ्यासाठी हा सीन चित्रित करणे फार कंटाळवाणे बनले होते.” असे तो म्हणाला होता. या चित्रपटातील हा सीन चित्रित करतेवेळी सिद्धार्थने अनेक टेक घेतले होते.

विशेष म्हणजे आलियाला किस करतानाचा अनुभव सांगतेवेळी सिद्धार्थने त्याची एक इच्छा सांगितली होती. यावेळी त्याने “मला एकदा तरी दीपिका पदुकोणला ऑनस्क्रीन किस करायचे आहे,” असे सांगितले होते. मात्र अद्याप सिद्धार्थ मल्होत्राची ही इच्छा पूर्ण झालेली नाही. आतापर्यंत त्या दोघांनी एकत्र काम केलेले नाही.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. याच चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुमारे ७५ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

Story img Loader