हिंदी मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा राकेश बापट सध्या खूप खुश आहे. अॅक्शन, ड्रामा आणि एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला असलेल्या वृंदावन सिनेमात राकेश मुख्य भूमिका साकारत आहे. राकेशची ही पहिलीच अॅक्शन फिल्म असून त्याने दिलेल्या फाईट सिक्वेन्सला हिंदी -सिनेसृष्टीच्या कलाकारांकडून दाद मिळत आहे. या चित्रपटात राकेशने केलेल्या स्टंटची चक्क बॉलीवूड कलाकारांनी दखल घेतली आहे. यापूर्वी सलमान खानकडून कौतुकाची थाप मिळालेल्या राकेशला आता किंग खान शाहरुखने देखील चीअर अप केले आहे. एवढेच नाही तर वरुण धवन, जॉन अब्राहम यांनी राकेशच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे. वृंदावन या सिनेमाची ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली असून राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर आणि जिगर कडकिया यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अनघा कारखानीस आणि कारखानीस यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. गणेश आचार्य यांनी सिनेमातल्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं असून अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. गुढीपाडव्याला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘वृंदावन’ च्या राकेशला मिळाली बॉलीवूडकडून शाबासकी
किंग खान शाहरुखने देखील चीअर अप केले आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
![‘वृंदावन’ च्या राकेशला मिळाली बॉलीवूडकडून शाबासकी](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/03/rakesh-bapat.jpg?w=1024)
First published on: 04-04-2016 at 12:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actors applause the work of rakesh bapat