प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वाढदिवसाचं एक दिवस आधीच जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या बर्थडे पार्टीला बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खान, जॅकी श्रॉफ ते अभिषेक बच्चन- ऐश्वर्या राय या दाम्पत्याने हजेरी लावली होती. या बर्थ डे पार्टीचे वेगवेगळे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या पार्टीत ऐश्वर्या रायने अभिषेकबरोबर एंट्री घेतली होती मात्र तिला आता नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

या पार्टीत येताना अभिषेकने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते तर ऐश्वर्याने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिने केस मोकळे ठेवले होते यावरूनच तिला ट्रोल केले जात होते. नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “हिची हेअरस्टाईल आता कायमचीच झाली आहे.” तर दुसऱ्याने लिहले आहे “हेअरस्टाईल बदलत नाहीस निदान कपड्यांची स्टाईल तरी बदलत जा, “असा टोला लगावला आहे. एकाने लिहले आहे “ही जोडी खोटी वाटते.”

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

मालिका संपताच साध्याभोळ्या नेहाचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का? क्रॉप टॉपमधला व्हिडीओ केला शेअर

बॉलिवूडचे शोमॅन म्हणून सुभाष घई ओळखले जातात. त्यांच्या ‘ताल’ चित्रपटात ऐश्वर्या रायने काम केले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल सोमवारी रात्री प्री-बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत सलमानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

दरम्यान ऐश्वर्या रायने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी तिची प्रमुख भूमिका असलेला ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

Story img Loader