बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. मग ते चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा एखाद्या पार्टीतले फोटो असो, त्यांच्या फोटोंवर नेटकरी कायमच कमेंट करत असतात. कलाकार आपले नवीन फोटो शेअर करतातच मात्र आपल्या बालपणीचे फोटोदेखील शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आणि त्यांच्याकडेवर एक चिमुकली आहे असा फोटो व्हायरल होत आहे. फोटो पाहून तुम्हाला ही प्रश्न पडला असेल ना ही अभिनेत्री कोण? तर ही अभिनेत्री आहे बॉलिवूडची आजची आघाडीची अभिनेत्री अनन्या पांडे, अनन्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात तिने हा फोटो आणि रेखा यांच्याबरोबरचा आताच फोटो असा शेअर केला आहे.
KGF स्टार यश साकारणार रावणाची भूमिका; बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याला केलं रिप्लेस
अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये कायमच चर्चेत असते, अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनन्या पांडेने स्टुडन्ट ऑफ द ईअर २ या चित्रपटातून पदार्पण केले होते.
अनन्याचा मागच्या वर्षी ‘लाइगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र हा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. चित्रपटाला टीकेचा सामना करावा लागला होता. अनन्याने आयुष्मान खुरानाबरोबरच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं. तसेच झोया अख्तर आणि रीमा कागती लिखित ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं अनन्याने पोस्ट करत सांगितलं आहे.