शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा व्यवसाय करून सुपरहिट ठरला. हा वाद अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरून झाला होता. मात्र विरोध होऊनदेखील चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दीपिका आता पुढील चित्रपटाच्या तयारीला लागली असून तिने आता तिच्या मानधनातदेखील वाढ केली आहे.
बॉलिवूडची डिम्पल क्वीन अर्थात दीपिका पदुकोण, आजवर तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. पठाणमध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसला आहे. आता लवकरच ती दाक्षिणात्य अभिनेता प्रभासबरोबर ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी तिने तब्बल १० कोटींचे मानधन आकारणार आहे असे बोलले जात आहे.
अरिजित सिंहचा चाहत्यांना सुखद धक्का; कॉन्सर्टदरम्यान गायले ‘कांतारा’मधील ‘हे’ लोकप्रिय गाणे
५०० कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटात मोठया प्रमाणावर व्हीएफएक्स तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. वैजयंती मुव्हीजने या चित्रपटाची निर्मितीची बाजू सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास दीपिकाच्याबरोबरीने अमिताभ बच्चनदेखील दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना दुखापत झाली आहे.
प्रभास आणि त्याच्या टीमने चित्रपटाचे जवळपास ८० टक्के या चित्रपटाचे पूर्ण केले आहे. येत्या काही महिन्यांत या चित्रपटाचं उरलेलं चित्रीकरण पूर्ण होईल. नागा अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट २०२४ साली प्रदर्शित होणार आहे.