बॉलीवूडमधील बेस्ट डान्सर्सच्या नावाचा उल्लेख झाला की यात हेलन यांच नाव आघाडीवर असतं. हेलन यांनी ८०-९० त्या दशकात त्यांच्या दमदार डान्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. हेलन यांना बॉलिवूडमधील पहिल्या कॅबरे डान्सर म्हणून ओळखलं जातं. हेलन यांचं खरं नाव हेलन रिचर्डसन असं असून त्यांचा जन्म म्यानमार म्हणजेच तेव्हा बर्मा असं नाव असेल्या देशात झालाय. मात्र दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जपानी सैनिकांनी बर्मा देशावर हल्ला चढवला. यावेळी हेलन आणि त्यांच्या कुटुंबाने पायी चालत भारत गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र पायी चालत भारत गाठणं हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता या मार्गात त्यांना अनेक अडथळे आले. या सर्व जुन्या आठवणींना हेलन यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये उजाळा दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द कपिल शर्मा शो’मध्ये हेलन म्हणाल्या ,”आम्ही बर्माचे रेफ्युजी होतो. जेव्हा जपानी सैन्य बर्मा देशात आलं आणि त्यांनी बॉम्ब हल्ले सुरू केले तेव्हा आम्हाला आमचं घर सोडून पळावं लागलं.आम्ही जंगलातून भारताच्या दिशेने निघालो. भारतात पोहोचण्यासाठी आम्हाला अनेक महिने लागले. माझ्या सोबत माझी आई आणि भाऊ होता. मात्र आम्ही जेव्हा कोलकत्ता येथे पोहोचलो तेव्हा माझ्या भावाने जीव सोडला.साथीच्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला ”

हे देखील वाचा: ‘भाभीजी घर पर है’मधील अंगुरी भाभी इतकीच सुंदर आहे मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नी!

हावडा ब्रिज सिनेमातील गाण्यामुळे मिळाली लोकप्रियता

हेलन यांना भारतीय सिनेमातील बेस्ट कॅबरे डान्सर म्हणून ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरवात ग्रुप डान्सिंग मधून केली होती. अनेक सिनेमांच्या गाण्यांमध्ये त्यांनी बॅक डान्सर म्हणून काम केलंय. . हावडा ब्रिज सिनेमातील ‘मेरा नाम चून चून चू’ या गाण्यामुळे हेलन यांना मोठी लोकप्रियता मिळाली.. या गाण्यामुळे हेलन यांनी इतकी लोकप्रियता मिळाली की ट्राफिक सिग्नलवर त्यांना पाहूण लोक गर्दी करत.
यावेळेचा एक किस्सा हेलन यांनी शेअर केला होता. “एकदा ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबली असताना लोकांनी मोठी गर्दी केली होती. होती ही गर्दी पाहून माझ्या आईला खूपच आनंद झाला. माझं डोकं खिडकीतून बाहेर काढून ती आनंदाच्या भरात ‘हो हिच हेलन आहे’ असं म्हणू लागली.” हा किस्सा हेलन यांनी एक मुलाखतीत सांगितला होता.

‘शोले’, ‘डॉन’, ‘तीसरी मंजिल’ या सिनेमातील गाण्यांमुळे हेलन यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या सौदर्याचे आणि डान्सचे अनेक चाहते होते. सिनेमात काम करत असतानाच हेलन विवाहित असलेल्या सलीम खान यांच्या प्रेमात पडल्या.तर हेलन यांच्या सौदर्यावर सलीम खान देखील फिदा झाले. १०८० साली सलीम खान आणि हेलन यांनी लग्न केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress helen struggle come india from myanmar by walking lost brother also kpw