‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि काल पार पडलेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. ‘आरआरआर’ चे दिग्दर्शक एसएस राजामौली हे नाव आता संपूर्ण जगाला परिचयाचं झालं आहे. जगभरातुन त्यांचे कौतुक होत आहे. बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ अभिनेत्रीने राजामौलींबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी, नुकत्याच फ्री प्रेसजर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. “मोठ्या पडद्यावर कधी झळकणार?” असे विचारले असता त्या म्हणाल्या, “मला योग्य भूमिका मिळाली तरच मी एखादी कलाकृती करेन. मी वेबसीरीज करत आहे अशी घोषणा करणार नाही. मी एक अभिनेत्री आहे. मला अभिनय करायला आवडेल जर एखादी चांगली भूमिका असेल तर कृपया माझ्याकडे या.”

RRR २’ येणार; ऑस्करच्या यशानंतर दिग्दर्शक राजामौली यांची मोठी घोषणा!

“एसएस राजामौलीबरोबर काम करायला आवडेल का?” असे विचारले असता, त्या म्हणाल्या “जर मला दिग्दर्शक एसएस राजामौलीजी यांनी चांगल्या भूमिकेची ऑफर दिली तर मला त्यांच्याबरोबर काम करायला नक्कीच आवडेल.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

‘बाहुबली’ चित्रपटाने एसएस राजामौली प्रसिद्धीच्या झोतात आले. त्याआधी त्यांनी ‘मगाधिरा’, ‘मक्खी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. राजामौली मूळचे तेलगू भाषिक असून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात टेलिव्हिजन क्षेत्रापासून केली आहे. आज ते जगविख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखले जात आहेत.