अभिनेत्री हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हुमा नुकतीच ‘डबल एक्सएल’ चित्रपटात झळकली होती. तिला बऱ्याचदा शरीरयष्टीवरून तसेच वाढत्या वजनावरून बरंच ट्रोल करण्यात येत. नुकतीच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिने या कार्यक्रमात परिधान केलेल्या ड्रेसमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हुमा कुरेशी कायमच वेगवेगळ्या पद्धतीची फॅशन करत असते. मात्र फॅशनमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकत्याच एक कार्यक्रमात तिने एक जांभळ्या पद्धतीची वेगळी साडी परिधान केली होती. तिचा हा हा लूक सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून तिला आता नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरवात केली.

हिंदी चित्रपटांमध्ये मुस्लिम कायम…” नसीरुद्दीन शाहांची बॉलिवूडवर टीका; इतर समुदायांचाही केला उल्लेख

हुमाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ती गरोदर असल्याची कमेंट केली आहे. एकाने लिहले आहे, ती गरोदर आहे का? तर दुसऱ्याने लिहले आहे, ती गरोदर वाटत आहे. तिसऱ्याने लिहले आहे, तिचे पोट किती बाहेर आले आहे तिचा ड्रेसपण विचित्र आहे. आणखीन एकाने तिचे कौतुक केले आहे तो असं म्हणाला, ती छान दिसत आहे पण तिने तिला सूट होईल असेच परिधान करायला हवे. अशा प्रतिक्रिया येत आहेत.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. मूळची दिल्लीची असून, नाटकांमधून तिने काम करण्यास सुरवात केली. अभिनयनात करियर करण्यासाठी तिने २००८ साली मुंबई गाठली. तिचे वडील हॉटेल व्यवसायात असून तिचा भाऊ साकिब सलीमदेखील अभिनय क्षेत्रात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress huma qureshi trolled after her dressing netizens saying she is pregnant spg