अभिनेत्री जान्हवी कपूर मागच्या काही काळापासून तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अलीकडे ती तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा नुकताच वाढदिवसदेखील होऊन गेला. तिच्या वाढदिवसानिमित्त शिखरने अभिनेत्रींबरोबरचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. ज्यामुळे पुन्हा एकदा यांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. यावरच तिचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूर ‘राणा नायडू’ या आगामी टीव्हीसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिच्याबरोबर अभिनेता राणा दुगाबत्तीदेखील असणार आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या वेबसीरिजने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये राणाच्या हातात एक बंदूक दाखवली आहे तितक्या जान्हवी येते आणि त्याला म्हणते “तू अनेक सेलिब्रेटींचे प्रश्न सोडवले आहेस माझे का नाही सोडवलेस?”
ती पुढे म्हणते “मी माझ्या गाडीत पुढच्या सीटवर कधीच बसणार नाही. जो माझ्या बाजूला बसतो तो माझा बॉयफ्रेंड होऊन जातो.” तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ही सीरिज १० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, जान्हवी व शिखरने काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट केलं होतं. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता पुन्हा ते एकत्र आल्याची चर्चा आहे. ‘इ-टाइम्स’ दिलेल्या वृत्तानुसार जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने त्यांनी त्यांच्या नात्याला नव्याने आणखी एक संधी देण्याचा विचार केला आहे.”