बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दोन्हीही मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघीही दिसायला सुंदर आहे. त्या दोघीही बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये फार प्रसिद्ध आहे. जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. जान्हवीने २०१८ मध्ये धडक चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूरचा गुड लक जेरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने जान्हवी कपूरने तिच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. यात तिने तिचे लग्न आणि डेटींग याबद्दल खुलासा केला आहे.

जान्हवी कपूरने नुकतंच लग्न आणि डेटींग याबद्दल भाष्य केले आहे. यात तिने या मुद्द्यावरुन तिचे आई-वडील म्हणजेच श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात कशाप्रकारे भांडण व्हायची याबद्दल संगितले आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली, “एखाद्या व्यक्तीला डेट करणे ही माझ्या आयुष्यातील फार कठीण गोष्ट आहे, असे का याबद्दल नक्की माहिती नाही. पण माझे आई-वडील या विषयाला घेऊन सतत वाद करत असायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर मी कोणत्या मुलाला पसंत करत असेल तर तू थेट त्याला आमच्याकडे घेऊन ये आणि त्यानंतर आम्ही तुमचे रितसर लग्न लावून देऊ.”
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा

पण माझे मत याबद्दल वेगळे आहे. आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक मुलाशी आपण लग्न करु शकत नाहीत. त्यामुळेच मी अजूनही सिंगल आहे, असे जान्हवीने सांगितले. त्यापुढे ती म्हणाली की, “माझ्या लग्नात जास्त पाहुण्यांना आमंत्रित केले जाणार नाही. तसेच माझे लग्न अवघ्या २ दिवसातच होईल. त्यावेळी विवाहस्थळ हे मोगरा आणि मेणबत्त्यांनी सजवलेले असेल.”

“तुला स्क्रिप्ट आवडली नसेल तर तोंडावर सांग…” अतुल कुलकर्णी आमिर खानला असं का म्हणाले? जाणून घ्या

दरम्यान जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट २९ जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट २०१८ मधील तमिळ चित्रपट कोलामावू कोकिलाचा हिंदी रिमेक होता. त्यानंतर आता जान्हवी ‘मिली’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बवाल’ या तीन चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Story img Loader