अभिनेत्री जूही चावलाने 5G नेटवर्क विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करत जूहीने 5G नेटवर्कला विरोध दर्शवला आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवावर आणि पर्यावर्णावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचं म्हणत जूही चावलाने हे पाऊल उचललं आहे.
एकेकाळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री जूही चावला सध्या सिनेमांमध्ये झळकत नसली तरी पर्यावरण रक्षणासाठी जूही मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे म्हणजेच विकिरणांमुळे फक्त मानवी जीवनावरच नाही तर प्राणी आणि वनस्पतींवर देखील याचा दुष्परिणाम होऊ शकतो असं म्हणत जूहीने ही याचिका दाखल केलीय.
जूही चावलाची याचिका न्यायमूर्ती सी हरि शंकर यांच्यासमोर मांडण्यात आली होती. ही याचिका त्यांनी दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवली असून २ जूनला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. जर दूरसंचार कंपन्यांना 5G नेटवर्कसाठी परवानगी दिली तर या रेडिएशनच्या परिणामामुळे प्रत्येक मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींना धोका निर्माण होऊ शकतो असा दावा जूही चावलाने केला आहे.
View this post on Instagram
5G नेटवर्कचा पर्यावरणावर दुष्परिणाम होणार नाही हे दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं
हे विकिरण पृथ्वीवरील पर्यावरणाचं असं नुकसान करतील जे पुन्हा कधीच भरून काढणं शक्य नसेल. विकल दीपक खोसला यांच्या मदतीने ही याचिका जूही चावलाने दाखल केलीय. 5G नेटवर्कमुळे लोकांचा फायदा होईल यामुळे लोकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर परिणाम होणार नाही हे दूरसंचार कंपनीने स्पष्ट करावं असं याचिकेत नमूद करण्यात आलंय. शिवाय 5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे महिला, लहान मुलं, नवजात बालकं तसचं वनस्पती आणि पर्यावरणातील सर्व प्रकारच्या सजीवांवर विकिरणांचा प्रभाव होणार नाही हे दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं असं या याचिकेत म्हंटलं आहे.