तब्बल ४ दशकाहून अधिक काळ अभिनेत्री जुही चावला ही चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहे. या तिच्या कारकिर्दीत तिने कित्येक अभिनेते आणि दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. सिनेसृष्टीतली बरीच कलाकार मंडळी, त्यांचं कुटुंब यांच्याशी जुहीचे सलोख्याचे संबंध आहेत. कित्येक स्टार्सच्या मुलांना तिने लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. याच स्टारकिड्सबाबत जुहीचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.

पिंकव्हीलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखची मुलगी सुहाना खान आणि दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा वरुण धवन यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. शिवाय सध्या बॉलिवूड मध्ये चांगलीच प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कियारा अडवाणी हीदेखील आपल्या बालमैत्रिणीची मुलगी असल्याचंही जुहीने स्पष्ट केलं आहे.

IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”

जुही म्हणाली, “सुहाना आणि इतर मुलं ही माझ्या डोळ्यादेखतच लहानाची मोठी झाली आहेत. त्यांना सध्या या क्षेत्रात काम करताना बघून आनंदच होतो. डेविड धवन यांच्याबरोबर मी प्रथम जेव्हा काम केलं तेव्हा वरुणही अगदीच लहान होता. आता तोदेखील स्टार झाला आहे. ही सगळी मुलं खूप मेहनत घेत आहेत. सुपरस्टारची मुलं असली तरी ते कोणत्याही कामाला कमी लेखत नाहीत.”

आणखी वाचा : टेलरींग ते स्टेशनरीच्या दुकानात काम; गजराज राव यांचा संघर्षमय प्रवास, म्हणाले “त्यादिवशी फक्त…”

अभिनेता वरुण धवनने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केलं. सुहाना खान झोया अख्तरच्या ‘आर्चीस’ वेबसीरिजमधून मनोरंजनविश्वात पदार्पण करणार आहे. या सीरिजमधून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हेदेखील पदार्पण करणार आहेत. जुही चावलानेही नुकतंच वेबविश्वात पदार्पण केलं असून ‘हश हश’ ही तिची पहिली वेबसीरिज प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे.

Story img Loader