अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वादग्रस्त विधानांमुळे प्रत्येक वादामध्ये अडकणारी कंगना मात्र तिच्या कामाबाबत मात्र प्रचंड मेहनत घेताना दिसते. आपली प्रत्येक भूमिका रुपेरी पडद्यावर उठून दिसावी म्हणून ती धडपडत असते. आता देखील ती ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तिच्या लूकच कौतुक देखील होत आहे.

बॉलिवुडच्या काही लोकांवर ती कायमच टीका करत असते. आता तर तिने चक्क फिल्मफेअर या बॉलिवुडमधल्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याच्या विरोधात थेट कोर्टात जाणार आहे. ६७ व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२२ साठी नामांकन यादी समोर आली आहे. यामध्ये, रणवीर सिंगला ‘८३’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे, तर कंगनाला ‘थलायवी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महिला श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यासाठी तिला राग आला आहे. तिने आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

कंगनाचा जावेद अख्तर यांच्यांवर गंभीर आरोप, म्हणाली “हृतिकची माफी न मागितल्यामुळे…”

कंगनाने इन्स्टा स्टोरीमध्ये सांगितले की, तिने २०१४ पासून फिल्मफेअरवर बंदी घातली आहे. हा सोहळा अनैतिक, भ्रष्ट आणि पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे तिने म्हटले आणि ती याचा भाग होणार नसल्याचे सांगितले. कंगनाने सांगितले की, तिला यावर्षी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक फोन येत आहेत, कारण त्यांना ‘थलायवी’साठी हा पुरस्कार द्यायचा आहे. ती पुढे म्हणाली ‘ते अजूनही मला नामांकन देत ​​आहेत, हे जाणून मला धक्का बसला आहे. अशा भ्रष्ट प्रथांना कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देणे हे माझ्या प्रतिष्ठेच्या, कार्य नैतिकतेच्या विरुद्ध आहे. म्हणूनच मी फिल्मफेअरवर केस करण्याचा निर्णय घेतला आहे’.

फिल्मफेअरने देखील सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपली बाजू मांडली आहे तसेच त्यांनी कंगनाला दिलेले नामांकन देखील मागे घेतले आहे. मध्यंतरी कंगनाला डेंग्यूची लागण झाली होती. तिच्या इमर्जन्सी चित्रपटात श्रेयस तळपदे, अनुपम खेर महिमा चौधरी यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. कंगना यात इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसत आहेत.

कंगना या चित्रपटात अभिनयही करत आहे आणि दिग्दर्शनही करत आहे. त्याचबरोबर निर्मितीची जबाबदारीही त्यांच्या मणिकर्णिका फिल्म्सने सांभाळली आहे. पुढील वर्षी २५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader