बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर निशाणा साधल्यामुळे तर कधी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्यामुळे कंगना चर्चेचा विषय बनते. कंगणाने यावेळी मात्र बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचं कौतुक केलं आहे.

मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असलेला ‘सिता रामम्’ चित्रपट कंगनाने पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर कंगनाने सोशल मीडियाद्वारे चित्रपटाबद्दल असलेलं तिचं मत व्यक्त केलं आहे. “’सिता रामम्’ चित्रपट पाहण्याचा अनुभव फारच छान होता. चित्रपटातील लव्हस्टोरी, पटकथा आणि दिग्दर्शन उत्तम आहे”, असं म्हणत तिने दिग्दर्शक हनु राघवपुडी आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”

हेही वाचा >> Koffee With Karan 7 : आलिया-रणबीरला बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचा सल्ला, म्हणाली “लग्नानंतर फक्त सेक्स आणि…”

कंगनाने मृणाल ठाकूरचंही कौतुक केलं आहे. “चित्रपटात सगळ्याच कलाकरांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. परंतु, मृणाल ठाकूरने साकरलेल्या भूमिकेत अतिशय संयमित भावना आणि तिची कामाप्रती असलेली प्रतिष्ठा दिसते. कोणत्याही अभिनेत्रीने अशी भूमिका साकारलेली नाही. खरंच तू राणी आहेस. ठाकूर साहेब मॅम जिंदाबाद”, असं म्हणत कंगनाने मृणाल ठाकूरला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टॅगही केलं आहे.

हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?

हेही वाचा >> “मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा, म्हणाली “माझ्या गाडीचे ब्रेक फेल करुन…”

मृणाल ठाकूरने ‘सिता रामम्’ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा तेलुगू चित्रपट ५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. चित्रपटात मृणालसह अभिनेता दुलकर सलमानही प्रमुख भूमिकेत आहे. ‘सिता रामम्’मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधाना आणि अभिनेता तरूण भास्करनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader