सोशल मीडियावर आज फक्त एकच नाव ट्रेंड होत आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. त्यांना ७२ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यांतून लोकं शुभेच्छा देत आहेत. सामान्य माणसापासून मोठमोठे राजकीय नेते, उद्योगपति, सेलिब्रिटीज मोदीजी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. अजय देवगण, विवेक अग्निहोत्रीसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनीसुद्धा मोदीजी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील तिच्या खास शैलीत मोदीजी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना कंगनाने मोदी यांना सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व असं संबोधलं आहे. कंगनाच्या या कॉमेंटमुळे तिला ट्रोलही केलं जात आहे. बऱ्याचदा मोदी सरकारच्या समर्थनार्थ वक्तव्य देणाऱ्या कंगनाला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातं. तरी कंगना अगदी निर्भीडपणे तिची राजकीय बाजू मांडत असते.

नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना कंगना म्हणाली, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. रेल्वेस्टेशनवर चहा विकणारा मुलगा ते जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्व हा तुमचा प्रवास अविश्वसनीय असा आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. प्रभूश्रीराम, श्रीकृष्ण, आणि गांधीजींप्रमाणे तुम्ही अमर आहात. तुमचा राजकीय वारसा कुणीही सहज मिटवू शकणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक ‘अवतार’ मानते. तुमच्यासारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य आहे.”

आणखी वाचा : ट्वीट रॉजर फेडररसाठी, पण फोटो अरबाज खानचा; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे ‘ते’ ट्वीट व्हायरल

२०१८ मध्ये जेव्हा कंगना गीतकार प्रसून जोशी यांच्याबरोबर मोदीजी यांना भेटली होती तेव्हाच फोटो शेअर करत तिने मोदी यांना शुभेच्छा दिल्या. कंगनाचा आगामी ‘इमर्जन्सि’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कंगना भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय कंगना या चित्रपटाचं दिग्दर्शनही करणार आहे. कंगनाचा या चित्रपटातला लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

Story img Loader