अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणारी कतरिना सोशल मीडियावरही सक्रिय असते. सध्या तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती शाळेतील मुलांसह डान्स करताना दिसत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता थलापथी विजयच्या ‘मलम पिथा’ या लोकप्रिय गाण्यावर कतरिना व्हिडीमध्ये डान्स करत आहे. शाळेतील मुलांसह या गाण्याच्या हूक स्टेप करताना ती दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती ‘जॉली जिमखाना’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तामिळनाडूमधील ‘माउंटन व्ह्यू स्कूल’मधील कर्मचारी आणि मुलांबरोबर डान्स करतानाचे हे व्हिडीओ कतरिनाच्या चाहत्यांनी शेअर केले असून सोशल मीडियवर व्हायरल होत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा >> Viral Video मुळे फेमस झाला अन् अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली थेट चित्रपटात गाण्याची संधी

हेही वाचा >> “ती माझ्या आयुष्यात आली आणि…”, अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

कतरिनाची आई सुझैन यांनी २०१५ साली गरजू विद्यार्थ्यांसाठी तामिळनाडूत टमाउंटन व्ह्यू स्कूलट ही शाळा सुरू केली होती. याच शाळेच्या एका कार्यक्रमादरम्यान कतरिना शाळेतील मुलांसह दाक्षिणात्य गाण्यांवर थिरकताना दिसली.

हेही वाचा >> “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी

कतरिनाने डिसेंबर २०२१ मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. विकी-कतरिना ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. कतरिना लवकरच ‘फोन बुथ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटातही ती दिसणार आहे.

Story img Loader