अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. त्यानंतर दोघंही बरेचदा एकत्र स्पॉट झाले आणि या जोडीला चाहत्याची चांगलीच पसंती मिळाली. अशातच सिद्धार्थने एका पुरस्कार सोहळ्यात केलेल्या कृतीने पत्नी कियाराने दिलेल्या प्रतिक्रियाची सध्या चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा कामाला लागला आहे. त्याने आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात केली आहे. नुकताच तो बॉलिवूड हंगामाच्या स्टाईल आयकॉन या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. या सोहळ्यात त्याला स्टाईल आयकॉन पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना सिद्धार्थ म्हणाला, लग्नानंतरचा हा माझा दुसरा पुरस्कार आहे, याआधी मला पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचापुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मला वाटते की माझी पत्नी कियारा खूप आनंदी असेल कारण ती स्वतः खूप चांगली अभिनेत्री आहे आणि खूप स्टायलिश आहे. अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

‘भीड’ चित्रपटाला वादाचा फटका; प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख

कियारा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सिद्धार्थचा हा व्हिडीओ कियाराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यात तिने कॅप्शनमध्ये लिहले “या माणसाकडे माझे पूर्ण हृदय आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

लग्नानंतर कियारा लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्याबरोबरीने या चित्रपटात कार्तिक आर्यन दिसणार आहे. तर ‘योद्धा’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kiara advani given reaction to siddharth malhotra after receiving award spg