अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. त्यानंतर दोघंही बरेचदा एकत्र स्पॉट झाले आणि या जोडीला चाहत्याची चांगलीच पसंती मिळाली. अशातच कियाराने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर पती सिद्धार्थने कमेंट केली आहे.

कियारा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते, नुकताच तिने एक बॅकलेस फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने गुलाबी रंगांचा ड्रेस परिधान केला आहे. “मला असं वाटतंय मी आज गुलाबी आहे” असा कॅप्शनदेखील दिला आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या कमेंट येत आहेत. त्याचबरोबरीने सिद्धार्थने कमेंट केली आहे. त्याने लिहले आहे, “मला रंग लाव” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. त्याच्या या कमेंट वर नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केलं आहे. नवरा असावा तर असा असे अनेकांचे मत आहे.

Sanam Teri Kasam actress Mawra Hocane married to Pakistani actor Ameer Gilani
‘सनम तेरी कसम’च्या सरूने केलं लग्न, पाकिस्तानी अभिनेत्री मावराने निकाहचे फोटो शेअर करून चाहत्यांना दिला सुखद धक्का
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

२०२० हे वर्ष ठरलं सारा अली खानसाठी वाईट; म्हणाली, “माझं ब्रेकअप…”

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराने ७ फेब्रुवारीला जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केलं होतं. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. तसेच काही निवडक बॉलिवूड सेलिब्रेटींनी निमंत्रत करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे आणि त्याआधीच्या विधींचे बरेच फोटो व्हायरल झाले होते.

लग्नानंतर कियारा लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्याबरोबरीने या चित्रपटात कार्तिक आर्यन दिसणार आहे. तर ‘योद्धा’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे.

Story img Loader