बॉलिवूडची धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित, आजवर तिने अभिनयातून, नृत्यामधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज सकाळी एक दुःखद बातमी अभिनेत्रीने दिली आहे. आज सकाळी तिच्या आईचे म्हणजे स्नेहलता दीक्षित यांचे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या मुंबईतील घरात अखेरचा श्वास घेतला. नुकताच माधुरीचा तिच्या पतीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तिने माध्यमातील लोकांना अभिवादन केलं आहे.
माधुरी दीक्षित तिच्या आईच्या खूपच जवळ होती. मागच्या वर्षी ९० व्या जन्मदिनानिमित्त माधुरी दीक्षितने पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. माधुरीच्या कुटुंबीयांनी दुपारी अंत्यसंस्कार केले. तिथून परत येत असताना त्याआधी घरातून निघतानाचा अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
“चार मुलं झाल्यानंतर तिने…” माधुरी दीक्षितने सांगितली होती आईबद्दलची ‘ती’ अभिमानास्पद गोष्ट
माधुरी व्हिडीओमध्ये खूपच भावूक दिसत आहे. तिच्याबरोबर तिचे पती डॉ. नेनेदेखील आहेत. तिने पापाराझी आणि इतर मीडिया सदस्यांना हात जोडून अभिवादन केले आणि स्मशानभूमीकडे प्रस्थान केले. अगदी दिग्दर्शक इंद्र कुमार आणि बॉलिवूडच्या इतर दिग्गजांनीही अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती.
माधुरीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत तसेच अभिनेत्रींचे कौतुकदेखील केलं आहे. एकाने लिहले आहे, “अभिनेत्री खूपच खंबीर आहे.” तर दुसऱ्याने लिहले आहे, “त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.” तर आणखीन एकाने लिहले आहे, “ओम शांती”, काहींचं म्हणणं आहे “तिला एकटीला सोडला हा खूप दुःखद काळ आहे तिच्यासाठी,” अशा प्रतिक्रिया येत आहेत.