बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्या वैयक्तिक व व्यायसायिक जीवनावर आधारित ‘अरोरा सिस्टर्स’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता अरबाझ खान आणि प्रियकर अर्जुन कपूरदेखील झळकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, मलायकाच्या ‘अरोरा सिस्टर्स’ या वेब सीरिजमध्ये अरबाझ खान व अर्जुन कपूरदेखील दिसणार आहेत. परंतु हे दोघे एकत्र स्क्रिन शेअर करणार नसून वेगवेगळ्या भागांमध्ये ते मलायकासह काम करताना दिसणार आहेत. मलायकाच्या वेब सीरिजमध्ये अरबाझ व अर्जुन झळकणार असल्यामुळे या सीरिजबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘अरोरा सिस्टर्स’ची कथा केवळ मलायकाचं अरबाझ खान व अर्जुन कपूरबरोबर असलेलं नात यावर आधारित नसून यात अरोरा सिस्टर्सचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी याबद्दलही दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा >> “चित्रपट पाहायला एलियन्स…”, ‘ब्रह्मास्र’च्या यशावरून केआरकेनं केलेलं ट्वीट चर्चेत

मलायका अरोरा व अरबाझ खान १९९८ साली विवाहबंधनात अडकले. २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. मलायका आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. २०१९ मध्ये त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल जाहीर केलं होतं. अर्जुन-मलायका दोघेही सोशल मीडिया अकाऊंटवरून एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात.

हेही पाहा >> Photos : ‘फॅमिली अस्र’, आलिया-रणबीरने घेतली बॉडीगार्डच्या कुटुंबियांची भेट, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेता अरबाझ खानही मलायकापासून वेगळं झाल्यानंतर मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ते दोघेही एकत्र दिसले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress malaika arora shared screen with ex husband arbaaz khan and boyfriend arjun kapoor in arora sisters kak