बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मागच्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या अफवाही उठल्या होत्या. चाहतेदेखील त्यांच्या लग्नसाठी उत्सुक आहेत. लग्न या विषयावरच आता अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलायका अरोरा अनेकदा जिम अथवा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येते. अभिनयात सक्रीय नसली तरी कायम चर्चेत असते. नुकतीच तिने इंडिया टुडेच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तेव्हा तिला लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली, “लग्न म्हणजे सर्व काही आहे का? लग्न ही दोन व्यक्तींमध्ये चर्चा करून ठरवण्यात येणारी गोष्ट आहे. जर आपल्याला त्यात झोकून द्यायचे असेल तर आपण त्याबद्दल विचार करू, निर्णय घेऊ आणि आम्ही त्याबद्दल बोलू. सध्या आम्ही आमच्या जीवनावर प्रेम करत आहोत. आम्ही आमच्या प्री-हनिमूनच्या टप्प्याचा आनंद घेत आहोत.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

“मी अरबाजच्या कुटुंबासाठी कधीच….” घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनी मलायका अरोराचं खान कुटुंबाबद्दल वक्तव्य

मलायका अरोराने २०१७ मध्ये पती अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१९मध्ये तिने अर्जुन कपूरला डेट करत असल्याची कबुली दिली होती. मागच्या काही वर्षांपासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता ते लवकरच लग्न करू शकतात असं बोललं जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच असंही म्हटलं होतं की मलायका आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहानचं अर्जुन कपूरशी चांगलं बॉन्डिंग नाही त्यामुळे तो आता वडील अरबाज खानबरोबर राहत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं १९९८ मध्ये लग्न झालं होतं आणि २०१७ मध्ये दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. या दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress malaika arora talk about her marriage plans with arjun kapoor spg