मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. नुकतीच तिने लॅक्मे फॅशन वीक या कार्यक्रमात दिसली, यावेळी तिने इतर अभिनेत्रींप्रमाणे रॅम्प वॉकदेखील केला आहे. रॅम्प वॉकमध्ये चालतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यावरून तीच कौतुक होत आहे.
मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा तिच्या डान्स व खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. लॅक्मेमध्ये रॅम्प वॉक करताना तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावरुन आता नेटकऱ्यांच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. एकाने लिहले आहे, “ती ४७ वर्षांची आहे असे वाटत नाही.” तर दुसऱ्याने लिहले आहे, “विश्वास बसत नाही ही ४७ वर्षांची आहे.” तिसऱ्याने लिहले आहे, “अनेकवर्षांपासून मी ऐकत आहे की तिचे वय ४७ आहे.” मात्र काहींनी तिच्यावर टीका केली आहे. “मेकअप काढला तर ५५ वाटेल” असेही काही म्हणत आहेत.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेननेदेखील रॅम्प वॉक केला आहे. हृदयविकाराचा धक्का येऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच सुश्मिता रॅम्पवर परतली आहे. रॅम्प वॉकनंतर तिचा ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा ते एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अर्जुन कपूरबरोबरच्या नात्याबाबत मलायका उघडपणे भाष्यही करताना दिसते.