बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्याने अनेक छोट्या छोट्या भूमिका करून तो आज बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपट केले. तसंच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. चित्रपटसृष्टीवर तो कायमच भाष्य करत असतो मात्र त्याने राजकीय व्यक्तींवर आपले मत व्यक्त केले आहे.
सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तीन राजकीय नेत्यांची नावे आवर्जून घेतली जातात. ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपचे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे राहुल गांधी, या तीन प्रमुख नेत्यांची देशात चर्चा आहे. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्याला या तीन नेत्यांमध्ये कोणता नेता आवडतो हा पर्याय दिला होता त्यावर तो म्हणाला, “माझ्यामते सगळे त्यांच्या त्यांच्या जागी मोठे आहेत. मात्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असल्याने मी त्यांचे नाव घेतो पण बाकीचेदेखील मोठे नेते आहेत.” असे उत्तर त्याने दिले.
नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या त्याच्या ‘हड्डी’ या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ह्या चित्रपटात तो एका तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याने मध्यंतरी या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. तो फोटो पाहून हा नवाजुद्दीन आहे हे ओळखणं सर्वांनाच कठीण झालं होतं.