मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ शोच्या दहाव्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अमृताच्या डान्सची परीक्षकांनाही भुरळ पडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि दिग्दर्शक करण जोहर या शोमध्ये परिक्षक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झलक दिखला जा’च्या एका भागात अमृताने लावणी सादर केली. अमृताचा डान्स पाहून नोरालाही लावणीचा मोह आवरता आला नाही. नोराने अमृतासह लावणीच्या तालावर ठेका धरला. ‘वाजले की बारा’  गाण्यावर अमृता-नोराने ठसकेबाज लावणी सादर केली. नोराने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केलेला पाहायला मिळला. अमृता-नोराच्या लावणी डान्सचा व्हिडीओ ‘कलर्स’ने सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हेही वाचा >> “ब्रिटिशांनी आपल्याला फसवून…”, लंडनला गेलेल्या प्राजक्ता माळीचा संताप, परदेशातील संस्कृतीबाबत केलं भाष्य

हेही वाचा >> Big Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो

अमृतानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नोरासह केलेल्या लावणी डान्सचा व्हिडीओ हटके कॅप्शनसह शेअर केला आहे. या पोस्टला तिने “लावणी करायलाच लावली पोरीला”, असं कॅप्शन दिलं आहे. अमृताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत “चांगलच जोरात जमतंय की”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “शेवटी नोराने लावणी केली”, असं कमेंट करत म्हटलं आहे.

हेही वाचा >> “मला त्यांच्यासारखं वडील व्हायचं नाही, कारण…”,  रणबीरने ऋषी कपूर यांच्याबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य

अमृता अभिनेत्रीबरोबरच एक उत्तम नृत्यांगणाही आहे. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. तिने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या लावणी नृत्यामुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. तिचं ‘चंद्रा’ हे गाणंही लोकप्रिय झालं. ‘झलक दिखला जा’ शोमध्ये अमृताच्या नृत्याची छाप परीक्षकांप्रमाणेच चाहत्यांवरही पडत आहे.