priyanka chopra boyfriend nick jonas engagement. अखेर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक यांनी आपल्या नात्याला वेगळं नाव दिलं असून, त्याची अधिकृत घोषणाही केली आहे. कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत प्रियांकाचा रोका पार पडला असून, खऱ्या अर्थाने या सेलिब्रिटी जोडीने त्यांच्या नात्याची कबुली देत साखरपुड्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळत आहे.
बऱ्याच दिवसांपासून प्रियांका आणि निकच्या नात्याविषयीच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. पण, आतापर्यंत त्या दोघांनीही आपल्या नात्याविषयीही माहिती उघड होउ दिली नव्हती. अखेर भारतात प्रियांका आणि निकच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत या दोघांच्याही नात्याला नवी ओळख मिळाली. सध्याच्या घडीला सोशल मीडिया आणि संपूर्ण कलाविश्वात प्रियांकाच्याच साखपुड्याची चर्चा होत आहे. तिच्यावर अनेकांनीच शुभेच्छांचा वर्षावही करण्यास सुरुवात केली आहे.
https://www.instagram.com/p/BmnNk6sgoJy/
आपल्या आयुष्यातील या खास वळणावर आलेल्या प्रियांकाच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदलहरी पाहायला मिळत होत्या. या खास दिवसासाठी तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर, निक पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तिला शोभून दिसत होता. उपस्थितांनीही यावेळी प्रियांका आणि निकला शुभाशिर्वाद दिल्याचं पाहायला मिळालं. प्रियांकाचा साखरपुडा याआधीच पार पडला होता. पण, पारंपरिक पद्धतीने रोका पार पडल्यानंतर आता कलाकार मित्रमंडळींसाठी खास पार्टीचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी आता नेमकं कोण हजेरी लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.