प्रियांका चोप्राच्या नावापुढे नक्की किती विशेषणं लावायची हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. कारण सुरुवातीला ‘देसी गर्ल’च्या नावाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली प्रियांका आता ‘क्वांटिको गर्ल’ या नावाने ओळखली जातेय. बॉलिवूड चित्रपटांमध्ये नावारुपास आल्यानंतर योग्य संधी मिळताच प्रियांकाने आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वाची वाट धरली आणि तिथेही यश संपादन केले. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसलेली प्रियांका हॉलिवूडमध्ये मात्र आपली छाप पाडत आहे. येत्या काळात ती एका पुरस्कार सोहळ्याच परफॉर्म करणार असल्याचे म्हटले जात आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतीलच एका पुरस्कार सोहळ्यात तीस मिनिटे म्हणजेच जवळपास अर्ध्या तासांच्या परफॉर्मन्ससाठी तिच्याकडे विचारणा करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात पार पडणाऱ्या त्या पुरस्कार सोहळ्यात प्रियांका तिच्या गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्म करेल असे म्हटले जातेय. सध्या या प्रस्तावावर ती विचार करत असून, जर तिने हा प्रस्ताव स्वीकारला तर एक, दोन नव्हे तर तब्बल १२ कोटी रुपयांचे घसघशीत मानधन तिला देण्यात येणार आहे. बसला ना तुम्हालाही धक्का?

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

सेलिब्रिटींना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी साधारण कोट्यवधींचे मानधन दिले जाते ही बाब पटण्याजोगी आहे. पण, प्रियांकाच्या बाबतीत मात्र तसे नाहीये. सध्याच्या घडीला तिचे चित्रपट आणि कारकिर्दीत आलेले वळण पाहता तिला या परफॉर्मन्ससाठी देण्यात येणारे मानधन अगदी योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण, इतर अभिनेत्री आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या सेलिब्रिटींना ही गोष्ट पटते का, हे पाहणेदेखील फार महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियांकाने त्या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करण्याचा प्रस्ताव स्वीकारला तर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रियांकाचा बॉलिवूडमधील तोच अंदाज पाहता येणार आहे.

 

Story img Loader