बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आता अभिनेत्री राधिका मदनच नाव देखील सामील झालं आहे. राधिका मदनने खूप कमी वेळात या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. जरी आज राधिका यशाच्या शिखरावर असली तरी तिला अजूनही ऑडिशन द्यायला आवडतात असे तिने एका मुलाखतीत सांगितले. प्रत्येक कलाकाराला एक योग्य संधी मिळाली पाहिजे असं तिला वाटतं आणि मेहनत घेऊन काम करण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातच नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिका मदनने मोजक्याच चित्रपटात कामं केली आहेत. मात्र तिच्या प्रभावशाली अभिनयामुळे तिने लाखो प्रेक्षकांची मनं  जिंकली आहेत. जरी तिने आज एका यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिचे स्थान निर्माण केले असले. तरी अजूनही ती स्वःताला एक नवोदित अभिनेत्रीचं मानते आणि इतर स्ट्रगलिंग कलाकारा सारखचं तिला देखील ऑडिशन देऊनच प्रोजेक्टवर काम करायला आवडते. राधिकाने याबद्दल आपले मत मांडताना एका मुलाखतीत सांगितले की, “आज मी ज्या स्थानावर आहे, की मी माझं स्क्रिप्ट निवडू शकते. मात्र तरीही मला जर का ऑडिशन देण्याची संधी मिळत असेल तर मी ऑडिशन देते.”

या पुढे ती सांगते की, “निर्मात्यांना ऑडिशन नको असतात. मात्र ती त्यांना सांगते की मला ट्रायल करायची आहे . कारण ही एक प्रक्रिया आहे. यामुळे तुम्हाला कळतं की एका पात्राकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत?, तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकता का?, या प्रक्रियेमुळे तुम्ही त्या पात्राला योग्य न्याय देऊ शकता आणि या सगळ्यामुळे दोन्ही बाजू स्पष्ट होतात.” राधिकाला ‘अंग्रेजी मिडियम’या चित्रपटाच्यावेळेस पूर्ण खात्री होती की ती तारिका बंसलची भूमिका साकारूशकेल आणि म्हणूनच तिने निर्मात्यांना खात्री पटवून दिली , या भूमिकेसाठी तिला प्रचंड महेनत घायावी लागली होती. राधिका ३० वर्षांची असून तिला या चित्रपटासाठी १७ वर्षांच्या मुलीची भूमिका साकारायची  होती.

सध्या राधिका यशाच्या शिखरावर आहे. ती वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. नेटफ्लिक्सची ‘रे ‘ आणि ‘फिल्स लैक ईशक’ या शॉर्ट सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. तसंच ती तिच्या आगामी चित्रपट ‘शिद्दत’साठी तयारी करत आहे. याबरोबरच राधिका अजून बऱ्याच प्रोजेक्ट्सवर काम करते आहे. ज्याची घोषणा लवकरच करण्यात येईल असे तिने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress radhika madan openup about how she believes in fair chance and she loves auditioning aad