बॉलीवूड अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी स्वत:च्या पतीविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पती आपला शारिरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे रती अग्निहोत्री यांनी तक्रारीत म्हटले आहे. वरळी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली. रती अग्निहोत्री यांनी आजपर्यंत बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९८१ साली के. भालचंद्र यांच्या ‘एक दुजे के लिए’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यातही आले होते. याशिवाय ‘लक’, ‘शादी के साईड इफेक्ट्स’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘वर्दी’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये रती यांनी काम केले आहे. १९८५ साली त्या उद्योगक अनिल विरवानी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या. 

Story img Loader