अभिनेत्री रिचा चड्ढा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र रिचाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं आहे.

रिचाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या एका फोटोत तिच्या पायाला बॅन्डेज दिसतंय. तर दुसरा फोटो तिच्या पायाच्या एक्सरेचा आहे. ज्यात तिच्या पायाच्या करंगळीला दुखापत झाल्याचं दिसतंय. रिचाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे. तसचं तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे.

रिचाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. “धैर्य”. रिचाच्या या फोटोवर अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये म्हंटलं आहे, ” लवकर बरी हो भिडू.” अशी कमेंट त्यांनी दिलीय. त्याचसोबत अभिनेत्री नीना गुप्ता, श्रुती सेठ, अक्षय ऑबेरॉय अशा अनेक सेलिब्रिटींना रिचाची विचारपूस केली आहे. नीना गुप्ता यांनी रिचाला दुखापतीचं कारण विचारलं. यावर ठेच लागण्याने दुखापत झाल्याचं रिचाने सांगितलं आहे.

तर डॉक्टर जयश्री शरद यांच्या कमेंटवरून रिचाने दुखापत झाली असताना कामाची कमिटमेन्ट पाळल्याचं लक्षात येतंय. त्यांनी केमंट बॉक्समध्ये लिहलं आहे.”लवकर बऱ्या व्हा. तुमची कामाची तप्तरता पाहून थक्क झाले. ही घटना घडूनही तुम्ही आमचं इन्स्टालाईव्ह रद्द नाही केलं. मी तुमची आभारी आहे.” असं त्या म्हणाल्या आहेत. याला उत्तर देत रिचा म्हणाली ” होय हे आपल्या चॅटच्या काहीवेळ आधीच झालंय.”
रिचा चड्ढा ‘फुकरे-3’ या सिनेमातून झळकणार आहे. तर बॉयफ्रेण्ड अली फैजलसोबत ती निर्मिती क्षेत्रात उतरत आहे.

Story img Loader