बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान. सलमानची पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. एव्हढंच नव्हे तर दोघांनी लग्न करायचा निर्णय देखील घेतला होता, मात्र लग्न करण्याच्या आधीच ते वेगळे झाले. नंतर २०१० साली संगीताने क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन सोबत लग्न केलं, कालांतराने ते दोघेही विभक्त झाले. संगीताने एका मुलाखतीत सलमान सोबत असलेल्या तिच्या नात्या बद्दल खुलासा केला आहे .

संगीता आणि सलमान जवळजवळ १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा त्यांना एकत्र सपोट केलं आहे, ते नेहमीच एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. नुकत्याच एका मुलाखती सलमान खान आणि तिच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाली, “मैत्री केली आहे तर ती निभावावी लगेलच.. आपण ज्या लोकांना ओळखतो त्यांच्या सोबत मैत्रीचे नातं ठेवायला पाहिजे. आम्ही मित्र आहोत, आणि आम्ही याा मैत्री चा आदर करतो.”

संगीता बराच काळ अभिनयापासून दूर राहिली आहे. तिच्या कमबॅक बद्दल बोलताना संगीताने सांगितलं की, “जर खरोखरच काहीतरी चांगलं खास प्रोजेक्ट आल तर मला नक्की काम करायला आवडेल. पण मी सध्या कामाच्या शोधत नाही.” विशेष म्हणजे संगीता बिजलानीने लग्नानंतर बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. यापूर्वी तिने ‘हातीम ताई’, ‘त्रिदेव’, ‘हाथी’ आणि ‘जुर्म’ सह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती जरी चित्रपटांपासून दूर असेली तरी पण ती बी-टाऊन पार्टीजमध्ये दिसते. सलमान खान बद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच कतरिना कैफ सोबत ‘टायगर ३’ मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.