बॉलिवूडची स्टार कीड सारा अली खान सोशल मीडियावर सक्रीय असते. कधी शुभमन गिलमुळे तर कधी चित्रपटांमुळे ती चर्चेत येत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतबरोबर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. साराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत २०२० सालाबद्दल भाष्य केलं आहे. २०२० वर्ष तिच्यासाठी वाईट ठरले.
२०२० हे वर्ष कोणीच विसरू शकत नाही. २०२० साली करोना या साथीच्या रोगाने संपूर्ण जगभरात थैमान घातले होते, अनेकांनी आपली माणसं गमावली, नोकऱ्या गमावल्या, ते वर्ष बॉलिवूडसाठीदेखील चांगले नव्हते. साराने नुकतीच ‘द रणवीर शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती, या कार्यक्रमात तिने ब्रेकअप, फ्लॉप चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे. तेव्हा ती असं म्हणाली, “२०२० साल हे माझ्यासाठी वाईट ठरलं. वर्षाची सुरवात माझ्या ब्रेकअपपासून झाली आणि ते आणखीन पुढे वाईट ठरत गेले.” २०२० साली तिचे ‘लव्ह आजकल २’, ‘कुली नंबर १’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते मात्र दोन्ही चित्रपट आपटले होते.
“बेडरूममध्ये या,” फोटोग्राफर्सवर संतापलेल्या सैफ अली खानने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आधीच त्यांनी…”
कार्तिक आर्यनबरोबर तिचे नाव जोडले गेले होते. या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चाही झाली होती मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. दोघांनी कधीच हे जाहीर केलं नव्हतं. काही दिवसांपूर्वी हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने या दोघांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सारा लवकरच ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे.