बॉलिवूडची स्टार कीड सारा अली खान सोशल मीडियावर सक्रीय असते. कधी शुभमन गिलमुळे तर कधी चित्रपटांमुळे ती चर्चेत येत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतबरोबर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘लव्ह आजकल २’, ‘सिम्बा’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या चुकांबद्दल भाष्य केलं आहे.
सामान्य माणसाप्रमाणे आपले लाडके सेलिब्रेटीदेखील चुका करत असतात, सारा अली खान तिच्या चुकांद्दल असं म्हणाली, “अभिनेते म्हणून आम्ही रोज शिकत असतो. आमचा प्रवासाचादेखील यात समावेश होतो. मला नेहमीच वेगळ्या गोष्टी करायला आवडतात. पण मला असंही वाटतं मी काही चुका केल्या आहेत. मी असे चित्रपट केले आहेत जे लोकांना आवडले नाहीत. पण मी हेच सांगेन की हेच या वयात चुका होतात. हेदेखील महत्वाचं आहे की आपण पडून पुन्हा उभे राहिले पाहिजे. माझी स्वतःची अशी काही तत्व आहेत.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
सारा लवकरच ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे. या चित्रपटाची तारीख अजून नक्की झाली असून हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.