पॉर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक केल्यानंतर बसलेल्या मानसिक धक्क्यातून शिल्पा शेट्टीने स्वत:ला सावरलं असून पुन्हा एकदा आपल्या करिअरकडे लक्ष दिलं आहे. पोलिसांनी राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टी घटस्फोटाच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात सगळं काही आलबेल असल्याचं दिसत आहे. शिल्पा शेट्टीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी नव्याने आपल्या नात्याला सुरुवात केल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पा शेट्टी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. बुधवारी शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दोघेही शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेताना दिसत आहेत. नवीन वर्षात पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीची ही पहिली पोस्ट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिल्पाने राज कुंद्रासोबत एकही पोस्ट शेअर केली नव्हती.

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडीओत दोघंही साईबाबांसमोर हात जोडून उभे असल्याचं दिसत आहे. व्हि़डीओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “सबका मालिक एक, श्रद्धा और सबुरी. ओम साई राम”.

गेल्या वर्षी शिल्पा शेट्टी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी मसुरीला गेली होती. शिल्पाने इन्स्टाग्रामला अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. शिल्पा शेट्टी राज कुंद्रासोबत वेळ घालवण्यासाठी मसुरीला गेली होती. यावेळी तिने जिलेबी खातानाचा एक व्हिडीओही शेअर केला होता.

शिल्पा शेट्टी शब्बीर खानच्या ‘निकम्मा’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिमन्यू दसानी आणि शर्ली सेठियासोबत ती दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘हंगामा २’ चित्रपटात शिल्पा शेट्टी दिसली होती. या चित्रपटातून शिल्पा शेट्टी कमबॅक करत होती, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपट फार कमाल करु शकला नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress shilpa shetty shares instagram post with raj kundra at shirdi saibaba temple sgy