बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे. सोनम आणि आनंद आहुजाला २० ऑगस्टला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांच्या लाडक्या लेकाचा नामकरण सोहळाही काही दिवसांपूर्वीच पार पडला. सोनम आणि आनंद आहुजाने त्यांच्या बाळाचं ‘वायु’ असं नाव ठेवलं आहे. आता वायूच्या रूमचे फोटोही समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महीप कपूरने सोनम कपूरच्या मुलाच्या रूमचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. महीप कपूर बॉलिवूड अभिनेता संजय कपूर यांची पत्नी आहे. वायूसाठी सजवलेल्या रूमचे फोटो शेअर करत त्यांनी “वायु कपूर आहुजाचा रूम. किती क्यूट”, असं कॅप्शन दिलं आहे. फोटोमध्ये वायुच्या रूमचा दरवाजा बाहुल्यांनी सजवलेला दिसत आहे. सोनम कपूरच्या लेकाच्या रूमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> Koffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”

सोनम कपूरचा मुलगा वायुच्या रूमचा फोटो.

हेही वाचा >> KBC 14 : साडेसात कोटींसाठी क्रिकेटवरील प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला उत्तर माहीत आहे का?

आनंद आहुजाने काही दिवसांपूर्वी सोनम कपूर आणि वायुबरोबरचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर चाहते कमेंट करून सोनम आणि आनंदला शुभेच्छा देत आहेत. आनंद आहुजाने लाडक्या लेकासाठी केलेल्या खरेदीचा फोटोही इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. वायुचा जन्म झाल्यानंतर आनंदने त्याच्यासाठी खास शॉपिंग केली होती. वायुसाठी घेतलेल्या बूटांचा फोटो त्याने पोस्ट केला होता.

हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?

प्रेग्नन्सीदरम्यान अभिनेत्री सोनम कपूर चर्चेत होती. सोनमच्या बेबी शॉवर आणि मॅटर्निटी फोटोशूटची बरीच चर्चा रंगली होती. तिच्या बाळाला पाहण्यासाठी चाहतेही आतुर होते. सोनमने वायुला जन्म दिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress sonam kapoor son vayu room photo shared by maheep kapoor kak