बॉलिवूड अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होत असतात. अभिनेत्री सोनम कपूर अभिनयापेक्षा तिच्या फॅशनमुळे चर्चेत येत असते. सोनम जरी सध्या तिच्या आयुष्यात व्यस्त असली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिने मुंबईतील ट्रॅफिक समस्येबाबत ट्वीट केले मात्र नेटकऱ्यांनी तिलच ट्रोल केले आहे.

सोनम कपूर जरी लंडनमध्ये स्थायिक झाली असली तरी ती मुंबईत म्हणजे तिच्या माहेरी येत असते. नुकतीच ती मुंबईत प्रवास करत होती तेव्हा ती ट्रॅफिकमध्ये अडकली, यात तिचा वेळ गेला म्हणून तिने थेट ट्वीट केले. “मुंबईमध्ये गाडी चालवणे हा अत्यंत कटकटीचा प्रकार झाला आहे. मला जुहू से बॅंडस्टैंड पोहोचण्यात एक तास लागला. इथे प्रत्येक ठिकाणी खोदकाम, बांधकाम सुरु आहे. प्रदूषणाची समस्या आहे, हे नेमके काय चाललाय?” अशाच शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
Eknath khadse Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद, एकनाथ खडसे यांची भूमिका मवाळ

शाहरुख खान, कतरीनाबरोबर काम केलं तरच…” दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीने व्यक्त केली खंत

सोनमच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. एकाने लिहले आहे “जो पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते तो पर्यंत तिला प्रदूषणाची समस्या दिसत नव्हती जसे भाजपाचे सरकार आले तसे हिला समस्या दिसायला लागल्या आहेत.” तर दुसऱ्याने लिहले आहे “मॅडम तुम्ही महागड्या गाड्यांमधून फिरत आम्ही सामान्य माणसे बस टॅक्सीमधून धक्के खात जातो हे आमचे स्पिरिट आहे.” एकाने लिहले आहे “तुमचे घर जेव्हा बनले तेव्हादेखील प्रदूषण झाले.” अशा शब्दात तिच्यावर टीका केली आहे.

सोनम कपूर व आनंद अहुजाने २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये वायूचे आगमन झाले. प्रेग्नंन्सी दरम्यान केलेल्या फोटोशूटमुळेही सोनम बऱ्याचदा चर्चेत होती. ‘वीरे दी वेडिंग’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘खूबसूरत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता ती सुजॉय घोषच्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader