सोशल मीडियावर ‘फादर्स डे’च्या निमित्ताने बऱ्याच फोटो आणि व्हिडिओची गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येकजण या साऱ्यामध्ये आपल्या वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच अभिनेत्री सनी लिओनीच्या पतीने म्हणजेच डॅनिअल वेबरने एक असा फोटो पोस्ट केला, जो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
‘फादर्स डे’च्या निमित्ताने तीन मुलांच्या पालकत्त्वाची जबाबदारी घेणाऱ्या डॅनिअलने सनी आणि निशा सोबतचा एक फोटो पोस्ट केला. सोशल मीडियावर या फोटोला अनेकांनीच ‘इंटिमेट फोटो’ असं म्हणत त्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पाहण्यास सुरुवात केली. मुळात सनीने आपल्या आयुष्यात निशा या चिमुकलीला आणल्याबद्दल डॅनिअलने कृतज्ञतेच्या भावनेपोटी हा फोटो पोस्ट केला होता. त्यासोबत वडील होण्याचा आनंदही त्याने या फोटोच्या कॅप्शनसोबत व्यक्त केला. पण, हाच फोटो या सेलिब्रिटी जोडप्याला अडचणीत टाकून गेला.
वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?
अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर नाराजी व्यक्त करत सनीच्या कुटुंबाला ‘डर्टी फॅमिली’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे डॅनिअलने ज्या उद्देशाने हा फोटो पोस्ट केला होता त्याकडे नेटकऱ्यांनी दुर्लक्ष करत या विषयाला एक वेगळंच वळण दिलं. कोणी त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य करत हे असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची गरजच काय होती, असे प्रश्नही उपस्थित केले. सोशल मीडियावर सेलिब्रिटींचं ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. असं असलं तरीही कुठेतरी अशा माध्यमांवर वापरण्यात येणारी भाषा आणि समोरच्या व्यक्तीची असणारी प्रतिमा या गोष्टीकडेही लक्ष देण्याची गरज असल्याची गरज आहे हे खरं.