गोहत्या, गोमांस खरेदी विक्रीच्या प्रश्नावरुन सध्या देशभरात मोठे वादंग निर्माण झाले आहे. हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा कायदा हातात घेणाऱ्यांना इशारा दिलाय, मात्र तरीही अशा घटनांमध्ये काही फरक पडला नाही. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गाईंच्या रक्षेच्या नावाखाली निष्पापांचा बळी घेणाऱ्यांविरोधात निशाणा साधलाय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वराने अशा लोकांची कानउघडणी केली आहे. या ट्विटमध्ये ती म्हणते, ‘अंध भक्तांनो, गोमातेच्या नावाखाली एका निष्पापाचा बळी जाण्याआधी आपल्या धर्माबद्दल थोडंसं जाणून घ्या.’ तसेच, एका युजरच्या ट्विटला उत्तर देत तिने लिहिलंय की, तुमचा हिंदू धर्म लोकांचा गळा कापायला शिकवतो का? खोट बोला आणि गायींच्या कातडीची निर्यात करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरात आणि मध्य प्रदेशात कथित गोरक्षकांनी दलित व मुस्लिम महिलांवर हल्ले केले होते. याशिवाय राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही दलितांवरील हल्ल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे असे मत स्वराने व्यक्त केले. तसेच हल्ले करणारे खरोखरच गोरक्षक आहेत काय, याचीही शहानिशा करून घेणे आवश्यक असल्याचे स्वरा म्हणाली.

वाचा : बॉलिवूड पदार्पणात प्रभासने या दिग्दर्शकासाठी करण जोहरला नाकारलं?

गोहत्याबंदीसाठी तसेच गोमांस खरेदी विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकार गंभीर असून, सरकार नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नियमांतर्गत गायींची हत्या किंवा त्यांच्या मांस विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र कथित गोरक्षकांकडून मारहाण आणि जीव घेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये निष्पाप लोकांचा जीव जाण्याविरोधात अभिनेत्री स्वराने आवाज उठवलाय. स्वराच्या या ट्विटचं सोशल मीडियावर अनेकांनी समर्थन केलंय तर अनेकांनी टीकासुद्धा केली. ट्विटच्या माधम्यातून स्वरावर टीका करणाऱ्या व्यक्तींनाही तिने सडेतोड उत्तरं दिली.