अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखले जाते. सोशल मीडियावर सक्रिय राहून तिला समाजातील पटणाऱ्या किंवा खटकणाऱ्या गोष्टी ती अगदी बिनधास्तपणे मांडते. याचबरोबर चर्चेत असतं ते तिचं बोलणं. कंगनाच्या बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अभिनेत्री यामी गौतमने नुकतेच कंगनाबद्दल वक्तव्य केलं आहे.

यामी गौतम बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्री, तिने कायमच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत यामीने कंगनाचे कौतुक केलं आहे. ती असं म्हणाली, “हे कदाचित आम्ही एकाच राज्यातील असू म्हणून असेल पण ती खरोखरच एक उत्तम अभिनेत्री आहे. आपल्यामध्ये ती सर्वोत्कृष्ट आहे. मी नेहमीच कौतुक करताना काम बघूनच करते मग ती कंगना असो किंवा विद्या असो, वस्तुस्थिती अशी आहे की कंगनाने मला लग्नाच्यावेळी शुभेच्छा दिल्या होत्या.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Ambadas Danve
Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावरून ‘मविआ’त रस्सीखेच? अंबादास दानवेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य तो निर्णय…”
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

सोशल मीडियावर सक्रीय नसण्यामागचं रणबीर कपूरने सांगितलं कारण; म्हणाला “लोक आम्हाला बघून…”

यामिनीने पुढे सांगितले की आम्ही कधीच एकत्र काम केले नाही. मात्र ‘काबील’ चित्रपटाचे चित्रीकरण मनालीमध्ये सुरु असताना दोघांची भेट झाली होती, कंगनाचे मनालीमध्ये घर आहे. ती पुढे असंही म्हणाली, मनालीमध्ये आम्ही ‘चोर’चे चित्रीकरण करत होतो माझ्याबरोबर माझी आई होती. कंगनाने मला मेसेज करून सांगितले की घरी येऊन जा. मात्र चित्रीकरणातून मला वेळ मिळाला नाही.

यामी म्हणाली, “हा फक्त परस्पर आदर आहे आणि मला वाटते जो कोणी तुमच्याशी आदर आणि प्रेमाने वागेल त्याला परत मिठी मारली पाहिजे. आता तिच्या पुढील चित्रपटाची वाट बघत आहे. तिचे काम दिसते. यामी गौतम व कंगना रणौत दोघी मूळच्या हिमाचल प्रदेशच्या आहेत.

Story img Loader