यामी गौतम ही आजच्या पिढीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री. मॉडेलिंग, जाहिरात क्षेत्रातून तिने आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती. यामी गौतमने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील अनुभवाबद्दल ती कायमच मुलाखतींमधून सांगत असते. नुकतेच तिने एका चाहत्याच्या कृतीबद्दल भाष्य केलं आहे.

बॉलिवूड कलाकार व त्यांचे चाहते हा विषय कायमच चर्चेचा बनतो. कित्येकदा चाहते आपल्या कलाकाराच्या प्रेमापोटी आपल्या मर्यादा ओलांडताना दिसतात. त्यामुळे साहजिकच कलाकरांना याचा त्रास होतो. यामीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती असं म्हणाली,”आजकाल कोणीही कधीही व्हिडीओ बनवू शकतो. एका तरुण मुलगा माझ्या शेतावर आला होता. १९-२० च्या आसपास त्याचे वय असेल त्याने माझ्या स्टाफकडे विनंती केली की मला तिच्याबरोबर फोटो काढायचा आहे.”

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Shabana Azmi
“वाईट कलाकार हे वाईट कलाकारच असतात”, शबाना आझमींचे स्पष्ट वक्तव्य; म्हणाल्या, “चांगले दिसणाऱ्यांकडे…”
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडणं लकी ठरलं का? ओंकार भोजने म्हणाला, “ती एक वेळ…”

ती पुढे म्हणाली, “मी खूपच मोकळ्या स्वभावाची आहे. मी राहते ते छोटे शहर आहे तिथे लोक येतात तुमच्याशी गप्पा मारतात. मला ही ते आवडते. तो माझ्याकडे फोटो काढण्यासाठी आला मात्र मला कळले की तो व्हिडीओ काढत आहे. त्याने व्हिडीओ काढला आणि पोस्ट केला त्याला मिलियनमध्ये व्हयूज मिळाले. मला हे पटले नाही.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.

यामीचा नुकताच ‘लॉस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिने ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. तसंच ती ‘यह प्यार न होगा कम’ मध्ये ती गौरव खन्ना बरोबर दिसली. यामीचा अभिनय प्रेक्षकांना आवडला त्यानंतर यामी गौतमी घराघरात ओळखली जाऊ लागली. त्यानंतर तिने ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ यासारख्या चित्रपटातही तिने काम केलं. यामीने दिग्दर्शक आदित्य धरसह जून २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांनी कुटुंबिंयाच्या उपस्थित लग्नसोहळा पार पाडला होता. तिचा पती दिग्दर्शक असून त्याने उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात यामीची विशेष भूमिका होती.

Story img Loader