बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. काही दिवसांपूर्वीच यामीने लग्न केल्याचे समोर आले आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट ‘भूत पुलिस’ साठी चांगली चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिचे कौतुक केले जात आहे. यामी सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि चित्रीकरणा दारम्यानेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. असेच ‘भूत पोलिस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

यामी गौतमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो व्हिडीओ शेअर केला आहेत, ज्यात तिने भूताचा मेकअप केला आहे. तिच्या या मेकअपकडे पहुन नाटकरी थक्क झाले आहेत. हे  व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत तिने याला कॅप्शन दिलं, “मला हॉरर कथानक असलेल्या चित्रपटात काम करायला प्रचंड आवडते, याच करणासाठी मी भूत पोलिस या चित्रपटात ही भूमिका साकारत आहे. ही भूमिका सकारण वाटत तितक सोपं नव्हेत. कारण मला तयार होण्यासाठी जवळ जवळ तीन तास लागत असे, तसंच ४५ मिनिटं या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी लागायची.”

या चित्रपटाचा अनुभव तिने या पोस्ट मध्ये सांगितला आहे. पुढे या पोस्टमध्ये तिने सांगितलं कसं तिला रात्री हिमाचलच्या थंडीत शूट करायला लगायचे, पायात चप्पला नसेच्या आणि सगळे स्टंट स्वता: करायची. त्यातून तिला मानेला दुखापत झाली होती. मात्र या सगळ्यामध्ये तिला योगाची मदत झाली असल्याचे तिने त्या पोस्टद्वारे सांगितलं आहे. यामीने या पोस्टद्वारे तिला या भूमिकेसाठी दिल्या प्रेमा बद्दल सगळ्यांचे आभार मानले आहेत. यामीनीच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करुन तिचे कौतुक करत आहेत.

yami-comment
(Photo-Yami Gautam/Instagram)

‘भूत पोलिस’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १०  सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader