‘फिल्मालय स्टुडिओचे तेच गेट आणि त्या गेटमागचे तेच चेहरे.. कामाच्या शोधात फिरणारा मी या मोठमोठय़ा दारांमधून कित्येकदा निराश परतलोय..
मला अडवणारे हेच ते चेहरे आज वयामुळे ओळखण्यापलीकडे गेलेत.. तरीही ओळखीचे आहेत ते माझ्या, मी अजूनही या दरवाज्यांमधून ये-जा करतो फरक इतकाच आहे की आज हे चेहरे माझं स्वागत करतात, कधीकधी माझ्या येण्याने ते संकोचतात फार साधी माणसं आहेत ती…त्यांचा साधेपणा हीच त्यांची खरी ताकद आहे जी मला सगळ्यात जास्त भावते’, हे उद्गार आहेत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे.
सत्तरच्या दशकात ‘अॅंग्री यंग मॅन’म्हणून वादळ निर्माण करणारा महानायक अमिताभ बच्चन आज स्वत: सत्तरी पार करूनही तितक्याच आत्मविश्वासाने चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करतो आहे. अमिताभ बच्चन इतरांपेक्षा वेगळा का?, याचं उत्तर त्यांनीच ब्लॉगवर लिहिलेल्या या विचारांमध्ये आहे. तो मिलेनिअम स्टार आहे, जगभरातील लोक त्याला ओळखतात पण, त्याहीपलीकडे अतिशय विनम्र, विचारी, सह्रदय असा माणूस अमिताभमध्ये दडला आहे. जो आजही लोकांची मनं सहज जिंकून घेतो. गेली चार दशकं तब्बल १८० चित्रपटांमधून लोकांच्या मनावर गारुड करून असणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या या महानायकाला आमचा सलाम.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा