‘बँग बँग’ चित्रपटाचे टिझर प्रसिध्द होऊन अवघे २४ तास होत असतानाच अभिनेता हृतिक रोशनवर चित्रपटसृष्टीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हृतिक रोशन आणि कतरिना कैफचा अभिनय असलेल्या सिध्दार्थ आनंदच्या ‘बँग बँग’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक्ड टिझर पाहून करण जोहर, सोनम कपूर, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, बिपाशा बसु, अर्जुन कपूर आणि सोफीया चौधरी इत्यादी हृतिकच्या मित्रांनी टि्वटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘नाईट आणि डे’ या हॉलिवूडपटावरून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ‘बँग बँग’ चित्रपटाचे थायलंड, ग्रीस आणि अबू धाबी अशा अनेक ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले. तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Story img Loader