सिने कलाकारांनी रविवारी झालेल्या ‘मदर्स डे’च्या दिवशी आपल्या आईसाठी ‘पहिले प्रेम’, ‘सर्वात चांगली मैत्रिण’ आणि ‘देवा’ची उपमा देत तिच्याविषयीचा अभिमान प्रकट केला. अक्षय कुमार ने ट्विट केले की,  देव सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला निर्माण केले असे यहुदी लोकांचे मानणे आहे.  मला नाही वाटत की आईसाठी यापेक्षा अधिक चांगली उपमा  मी कुठे ऐकली आहे. आज मी जे काही आहे, ते माझ्या आईमुळे आहे. माझ्यासाठी ती  नेहमी आणि सदासर्वदा पहिले प्रेम राहील. माझ्या आईला आणि इतर सर्व मातांना ‘हॅपी मदर्स डे’. खरोखरच तुम्हाला देवाने पाठवले आहे.
अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, देव सर्व ठिकाणी पोहोचू शकत नव्हता. म्हणून त्याने आईची निर्मिती केली. हॅपी मदर्स डे !
मॉडेल आणि अभिनेत्री दिया मिर्झाने आपल्या आईच्या मिठीत असलेला स्वत:चा एक फोटो ट्विट (https://twitter.com/deespeak) केला.  दियाने आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले आहे की, माझी आई साहसी, समजुतदार आणि दयाळू आहे. माझ्या कामाने तुम्हाला सदैव गौरवांकित करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.
अनुभव सिन्हा लिहीतात की, मी प्रार्थना करतो की तुम्ही जिथे कुठे असाल, तिथे आनंदी राहा. मला तुमची खूप आठवण येते आणि माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. अनुभवच्या आईचे अलिकडेच निधन झाले.
आयुष्यमान खुराणा आणि अमृता रावने आल्या आईचे धन्यवाद मानले आहेत, तर चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकरने लिहिले आहे की आई समाजाला योग्य दिशा देणारी व्यक्ती आहे.
बिपाशा बासूने लिहिले आहे की, सर्व मातांना नमस्कार, हॅपी मदर्स डे, माझी आई माझ्यासाठी सुपरवूमन आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करते.

Story img Loader