भारतीय वंशाचे ब्रिटिश – अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली. न्यूयॉर्कमधील बफेलो जवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्या हल्ल्यात ते जखमी झाले. संपूर्ण जगभरातून सलमान रश्दी यांच्या प्राणघातक हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. अनेकजण या घटनेचा निषेधही व्यक्त करत आहेत.

सर्वसामान्यांप्रमाणे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा : लेकीच्या लग्नासाठी सोनालीच्या आईने पहिल्यांदाच केली ‘ही’ गोष्ट

सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विट करत आपली रश्दी यांच्या हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काही कट्टरवाद्यांनी सलमान रश्दी यांच्यावर केलेल्या या हल्ल्याचा निषेध करतो. मला आशा आहे की न्यूयॉर्क पोलीस आणि न्यायालय हल्लेखोराविरुद्ध शक्य तितकी कठोर कारवाई करतील”, असे ट्विट करत अख्तर यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनेही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिले – “या जिहादींनी आणखी एक भयावह घटना घडवली आहे. ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे. माझ्याकडे शब्द नाहीत…धक्का बसला.”

आणखी वाचा : “शरीर आजारी असतं पण…” कंगना रणौतला डेंग्यूची लागण, आजारपणातही ‘इमर्जन्सी’च्या सेटवर करतेय काम

याव्यतिरिक्त अभिनेत्री स्वरा भास्करनेही या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये सलमान रश्दी यांच्यावरील हल्ला लज्जास्पद, निषेधार्ह आणि भ्याड असल्याचे लिहित निषेध व्यक्त केला.

सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहेत. या पुस्तकातील विचार मुस्लीमविरोधी असल्याचे काही मुस्लीम मूलतत्ववादींचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून त्यांना विविध प्रकारच्या धमक्या मिळत होत्या. शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये भर कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Story img Loader