नितीन चंद्रकांत देसाई यांनी स्वप्नांची एक दुनियाच एन.डी. स्टुडिओच्या रुपाने कर्जतमध्ये वसवली होती. हिंदी सिनेसृष्टीतल्या चित्रपाटांसाठी एकाहून एक सुंदर आणि भव्य सेट तयार करणाऱ्या एका कलादिग्दर्शकाचा मृत्यू त्याच्याच स्टुडिओत व्हावा यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय? त्यांचा स्टुडिओ हे त्यांचं स्वप्न होतं आणि याच स्टुडिओत गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर होता आणि त्याच तणावाखाली त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती समोर येते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र यशाची उत्तुंग शिखरं गाठूनही ज्यांचा शेवट अत्यंत विदारक पद्धतीने झाला असे फक्त नितीन चंद्रकांत देसाई हेच कलाकार नाहीत. तर अनेक कलाकार आहेत ज्यांनी यश पाहिलं. यशाच्या आकाशात भरारी घेतली. पण जेव्हा त्यांचा शेवट झाला तेव्हा तो अत्यंत विदारक परिस्थितीत झाला. आपण अशाच सेलिब्रिटींविषयी ज्यांचं आयुष्य झगमगाटात गेलं, पण शेवटचा काळ आणि मृत्यू मात्र वाईट परिस्थितीत झाला.

ए. के. हंगल

इतना सन्नाटा क्यूँ है भाई? हा अजरामर डायलॉग म्हणणारे ए. के. हंगल आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांनी तर वयाच्या ५२ वर्षी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. आपल्या आयुष्यात २२५ चित्रपटांमध्ये काम करत ए. के. हंगल यांनी भरपूर यश मिळवलं. त्यांनी पैसेही पुष्कळ मिळवलं. पण शेवटच्या काळात त्यांना आर्थिक चणचण सहन करावी लागली. वय वाढू लागल्याने त्यांना काम मिळणंही बंद झालं होतं. त्यांच्या आजारपणाचा खर्च करण्यासाठीही त्यांच्याकडे शेवटी पैसे उरले नाहीत. अमिताभ बच्चन यांनी ए. के. हंगल यांना २० लाख रुपयांची मदत केली होती.

भगवानदादा

भगवानदादा हे डान्सिंग स्टार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी एका सिनेमात सीन करत असताना ललिता पवार यांना थोबाडीत मारली होती. ती इतकी जबरदस्त बसली होती की ललिता पवार यांचा एक डोळा कायमचा अधू झाला होता. कपड्याच्या मिलमध्ये काम करणारे भगवान दादा हे जेव्हा सिनेमांमध्ये आले तेव्हा त्यांनी आजच्या घडीला कोट्यवधी रुपयांमध्ये गणली जाईल इतकी मालमत्ता त्यांनी कमावली होती. राज कपूर यांनी भगवान दादांना तर मायकल डगलसचीही उपमा दिली होती. जुहूच्या किनाऱ्यावर त्यांनी बंगलाही घेतला होता. तसंच त्यांच्याकडे सात लक्झरी कार त्या काळात होता. पण आपल्या ड्रीम प्रोजेक्टसाठी त्यांना हे सगळं गहाण ठेवावं लागलं. तो सिनेमा बनलाच नाही. त्यानंतर भगवान दादांना दारुचं व्यसन लागलं आणि हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला. प्रचंड यश पाहिलेल्या या माणसाचा अंत दादरच्या चाळीत झाला.

विमी

विमी नावाची एक अभिनेत्री सिनेमा सृष्टीत काम करत होती. जेव्हा ती सिनेसृष्टीत होती तेव्हा तिने खूप यश आणि पैसे मिळवले. मात्र नंतर तिचं खासगी आयुष्य अत्यंत वाईट परिस्थितीत होतं. तिने लग्न केल्यानंतर तिच्या आयुष्यात दुर्दैवाचे दशावतारच सुरु झाले. कारण विमीच्या नवऱ्याने तिला दारु प्यायची सवय लावली आणि वेश्या व्यवसायही करायला लावला. सिनेमाचं दहा वर्षांचं करिअर संपलं. सलग तीन सुपरहिट सिनेमा देणाऱ्या विमीचे सिनेमा नंतर फ्लॉप होत गेले. ३४ व्या वर्षी आजार जडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये ती उपचार घेत होती. जेव्हा विमीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या मृतदेहाला खांदा देणारंही कुणी उरलं नाही. विमीचा मृतदेह एका हातगाडीवरुन स्मशानात नेण्यात आला आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

भारत भूषण

६० रुपये महिना अशा पगारावर काम करणारे भारत भूषण हे त्यांच्या काळातले यशस्वी अभिनेते होते. त्यांच्याही अनेक सिनेमांना लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. भाईचारा, सावन, जन्माष्टमी, बैजू बावरा, मिर्जा गालिब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मुंबईत त्यांनी काही बंगलेही विकत घेतले होते तसंच महागड्या कारही विकत घेतल्या होत्या. त्यानंतर ते सिनेमा निर्मितीही करु लागले होते. पण पहिल्या दोन सिनेमांनंतर ते कर्जात बुडाले. त्यानंतर कंगाल झाले आणि पै-पै साठी त्यांना संघर्ष करावा लागला. १० ऑक्टोबर १९९२ या दिवशी भारत भूषण यांचं निधन झालं.

राज किरण

बुलंदी, कर्ज, घर हो तो ऐसा अशा अनेक सिनेमांमध्ये काम करणारे राज किरण एकाएकी सिनेसृष्टीतून गायब झाले. आपल्या करिअरमध्ये राज किरण यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांच्याविषयी अशा बातम्या समोर आल्या होत्या की त्यांच्या कुटुंबाने त्यांची फसवणूक करुन त्यांची सगळी संपत्ती लाटली. त्यामुळे राज किरणना रस्त्यावर वणवण फिरावं लागलं. हा धक्का सहन न झाल्याने राज किरण यांच्यावर मानसिक परिणाम झाला. अभिनेत्री दिप्ती नवल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की राज किरण अमेरिकेत टॅक्सी चालवतात. २०११ मध्ये ऋषी कपूर यांनी राज किरण हे मेंटल असायलममध्ये आहेत असंही सांगितलं होतं. मात्र राज किरण यांच्या कुटुंबाने या सगळ्या गोष्टी नाकारल्या.

सतीश कौल

महाभारत या लोकप्रिय मालिकेत इंद्राची भूमिका करणारे सतीश कौल यांनीही जवळपास ३०० सिनेमांमध्ये काम केलं होतं. करोनामुळे त्यांचं निधन झालं. पण आयुष्याच्या सरत्या काळात त्यांना वृद्धाश्रमात आयुष्य काढावं लागलं. प्रदीर्घ काळापासून सतीश कौल आर्थिक चणचण सहन करत होते. त्यांच्याकडे स्वतःच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी पैसे उरले नव्हते.

मिताली शर्मा

२०१६ मध्ये एक बातमी समोर आली होती ती बातमी होती मुंबईतल्या ओशिवारा भागात एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. त्या महिलेवर चोरीचा आरोप होता. ही महिला दुसरी तिसरी कुणी नाही तर मिताली शर्मा ही होती. एके काळी स्टार असलेली मिताली शर्मावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. जेव्हा पोलिसांनी तिला पकडलं होतं तेव्हा तिने चार ते पाच दिवस काहीही खाल्लं नव्हतं. अत्यंत कफल्लक अवस्थेत ती पोलिसांना सापडली होती.

महेश आनंद

८० ते ९० च्या दशकातला प्रसिद्ध व्हिलन म्हणजे महेश आनंद. महेश आनंदचा मृत्यू अत्यंत वाईट अवस्थेत झाला. आपल्या फ्लॅटमध्ये महेश आनंद मरुन पडले होते. तीन दिवसांनी त्याबद्दल माहिती मिळाली. १८ वर्षांपासून ते आर्थिक चणचण सहन करत होते. त्यांनी स्वतःच एक फेसबुक पोस्ट लिहून आपली फसवणूक झाल्याचं म्हटलं होतं. तसंच माझे मित्र मला दारुडा म्हणतात आणि माझ्या सावत्र भावाने माझी सहा कोटींना फसवणूक केली असाही उल्लेख केला होता. तसंच आपल्याकडे आता पाण्याची बाटली विकत घ्यायलाही पैसे उरलेले नाहीत असं म्हटलं होतं.