बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन मालक असलेल्या जयपूर पिंक पॅन्थर्स संघाने स्टार स्पोर्टस् प्रो-कब्बडी सामन्यात यू मुंबा संघाला नामोहरम करत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात विजयाची मोहोर उमटवली. अभिषेकचे वडील आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी अंतिम सामना संपताच आम्ही प्रो कब्बडीचे चॅम्पियन असल्याचा संदेश टि्वटरवर पोस्ट केला. त्यापाठोपाठ चित्रपटसृष्टीतील मित्रपरिवाराकडून अभिनंदनाच्या संदेशाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood congratulates abhishek bachchan as his team pink panthers wins pro kabaddi