अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांच्या चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. लवकरच आलिया-रणबीर आई-बाबा होणार आहेत. ते सोशल मीडियावरही अनेकदा चर्चेत असतात. परंतु सध्या आलिया-रणबीर त्यांच्या एका कृतीमुळे ट्रोल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. तिच्या बर्थडे पार्टीला आलिया-रणबीरने हजेरी लावली. या बर्थडे पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करीनाच्या बर्थडे पार्टीला आलिया-रणबीर पोहोचताच पापाराझी छायाचित्रकारांनी त्यांना फोटोसोठी पोझ देण्यास सांगितले. परंतु, आलिया-रणबीर तसेच निघून गेले. त्यांच्या या कृतीमुळे नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.

हेही वाचा >> “अनिरुद्ध मला खूप आवडतो कारण…”, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

हेही वाचा >> मृणालचा ‘सिता रामम्’ पाहून कंगना रणौत भारावली, म्हणाली “ठाकूर साहेब…”

एका नेटकऱ्याने व्हिडीओवर कमेंट करत “यांचे फोटो घेणे बंद करा”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हा तर आलिया-रणबीरने खूप महत्त्व दिलं. आता चित्रपट प्रदर्शित झाला तसं दुर्लक्ष करत आहेत”, अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने “चित्रपट प्रदर्शित झाला, पैसे मिळाले आता गर्विष्ठपणा सुरू झाला”, अशी कमेंट करत आलिया-रणबीरला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा >> Koffee With Karan 7 : आलिया-रणबीरला बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचा सल्ला, म्हणाली “लग्नानंतर फक्त सेक्स आणि…”

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया-रणबीरने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री मौनी रॉय, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood couple alia bhatt ranbir kapoor troll kareena kapoor khan birthday party video viral kak