बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. अनुराग सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. अनुराग कश्यप कायमच बॉलिवुडविषयी भाष्य करताना दिसून येतो. नुकतेच त्याने मराठमोळा अभिनेते मकरंद देशपांडे यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.
ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अग्ली’, ‘रमन राघव 2.0’ आणि ‘देव.डी’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीचे अनुराग कश्यपने दिले आहेत. त्याने आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली आहे. नुकताच तो ‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा त्याने मुंबई शहराबद्दल, नवीन कलाकरांबद्दल तसेच करियरच्या सुरवातीच्या काळाबद्दल भाष्य केलं आहे. तो असं म्हणाला, “मी मुंबईत आलो तेव्हा पृथ्वी थिएटरमध्ये नाटक करत होतो. तेव्हा माझी ओळख मकरंदन देशपांडेशी झाली. तेव्हा तो चित्रीकरण करून मिळालेलय पैशात नाटक बसवायचा, आम्ही एन एम कॉलेजमध्ये नाटकांच्या तालमी करायचो.”
“दारू आणि ड्रग्सच्या नशेत…” पार्टीतून बाहेर पडताना चेहरा लपवल्याने फरहान अख्तर, अमृता अरोरा ट्रोल
अनुराग पुढे म्हणाला, “मकरंद देशपांडे नाटक बसवायचा, जर आमचे संवाद पाठ झाले असतील तर तो आम्हाला नाश्ता द्यायचा त्या नाश्त्यात कधी इडली, वडापाव असे पदार्थ असायचे, ज्याचे संवाद पाठ व्हायचे नाहीत त्यांना खायला तो द्यायचा नाही. आम्ही ते खाण्यासाठी तालमीला जायचो.” हा किस्सा त्याने शेअर केला आहे.
अनुराग कश्यप दिग्दर्शित आगामी ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. करण मेहता, अलाया एफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच अभिनेता विकी कौशल यात ‘डिजे मोहब्बत’च्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.