बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. नुकताच त्याचा तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खरं तर मागचं वर्ष त्याच्यासाठी लकी ठरलं, रणबीरचा ‘शमशेरा’ जरी आपटला असला तरी त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट सुपरहिट ठरला. रणबीर कपूरबद्दल नुकतंच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने भाष्य केलं आहे.

दिग्दर्शक लव्ह रंजन बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शकांपैकी एक, ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटातून पहिल्यांदाच त्याने रणबीर कपूर श्रद्धा कपूर या कलाकारांना मोठ्या पडद्यावर आणलं आहे. रणबीरने या चित्रपटासाठी मानधन घेतलेले नाही. याबद्दल लव्ह रंजन म्हणाला की, “त्याने आजपर्यंत मानधन घेतलेलं नाही. तुमच्या आयुष्यात जेव्हा असा एक काळ येतो तेव्हा तुम्ही एखाद्याकडे मदत मागता. गेल्या ४ वर्षात त्याने मला एकदाही नाराज केलेले नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…

बॉक्स ऑफिसवर दणकून आपटलेल्या चित्रपटांबद्दल कपिल शर्माचं वक्तव्य; म्हणाला, “आमच्यावर इतकी वर्ष प्रेम केलं…”

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाला फायदा झाल्याचं दिसून आलं.तर आता प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ७६.२९ कोटींची घसघशीत कमाई केली आहे.

या चित्रपटामध्ये रणबीर आणि श्रद्धासह डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Story img Loader